Thursday, 21 November 2019

१२वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन २०१९ तर्फे साईबाबांच्या पवित्र भूमित शिर्डी येथे भव्य दिव्य समारोह


१२वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन २०१९ तर्फे साईबाबांच्या पवित्र भूमित शिर्डी येथे राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या भव्य दिव्य समारोहात  भारतीय सैन्यातील पूर्व उपसेनापती लेफ्टनन जनरल श्री. उर्मित सिंग (नवी दिल्ली), तसेच पद्मश्री डॉ. श्री विजयकुमार एस शहा  यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महिलाशक्ती पुरस्कार देऊन श्रीमती आशा अशोक ब्राम्हणे यांना सन्मानित करण्यात आले. शिर्डी मधील साई नीम ट्री या सुसज्ज 5 स्टार हॉटलच्या बॅन्क्वेट हॉल मध्ये हा नयनरम्य सोहळा अतिशय नियोजनपूर्व पार पडला.
  या सोहळ्यासाठी भारतभरातून विविध सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध अभिनेते राम गायकवाड यांनी भुषविले. श्री संजिव जैन्थ ( कुलसचिव भारतीय प्रौद्योगिक संस्थान हरीद्वार, उत्तराखंड), श्रीमती फरजाना इकबाल डांगे (महा. राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य), लॉ. श्री वसंतराव धाडवे (सामाजिक एकता मिशन नवी दिल्ली), इ विशेष अतिथी उपस्थित होते. त्याच बरोबर विद्या घारे ( मिसेस हेरीटेज इंटरनॅशनल, कोलंबो) व मृणाल गायकवाड ( मिसेस हेरीटेज इंटरनॅशनल, सिंगापुर), या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होत्या.
श्रीमती आशा अशोक ब्राम्हणे हया पी / उत्तर विभागातील  मढ म .न .पा .शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment