Omron Experience Center Inauguration by Omron Healthcare MD, Kazunori Tokura in Mumbai today -Photo By Sachin Murdeshwar/ TGN |
अनोख्या ‘एक्स्परिअन्स कम सर्विस सेंटर’सह ग्राहक टच-पॉइण्ट्सचे प्रबळीकरण
मुंबई, ४ ऑक्टोबर २०१९: घरगुती आरोग्य देखरेख व थेरपीसाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे देणा-या क्षेत्रातील जागतिक प्रमुख कंपनी ओमरॉन हेल्थकेअर इंडियाने आज मुंबईतील ठाणे पश्चिम येथे त्यांच्या पहिल्याच एक्स्परिअन्स कम सर्विस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या सेंटरसह ओमरॉनचे एक्स्परिअन्स, सर्विस आणि पिक-अप सेंटर्ससह भारतभरात ५८ टच पॉइण्ट्स आहेत. यामधून ग्राहकांपर्यंत पोहोचत त्यांना उत्पादनांचा वापर करण्याचा अनुभव देण्याप्रती आणि दर्जात्मक दुरूस्ती व सेवा जलदपणे उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
तंत्रज्ञानामधील वाढत्या प्रगतीसह ग्राहकांना खासकरून प्रतिबंधात्मक हेल्थकेअर क्षेत्रामध्ये दैनंदिन अधिकतम उपयोग होणा-या उत्पादनांबाबत माहिती मिळत नाही. म्हणूनच ओमरॉनचे एक्स्परिअन्स सेंटर उत्पादनांच्या वास्तविक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उत्पादन अनुभव देण्याचा प्रयत्न करते. तसेच हे सेंटर सामान्य तपासणी समस्या ते प्रगत तंत्रज्ञान इंटरवेन्शन्सपर्यंत दुरूस्ती सेवांची परिपूर्ण सुविधा देते. या एक्स्परिअन्स सेंटरमध्ये ग्राहकांसाठी ‘एक्स्परिअन्स झोन’ आहे, जो ग्राहकांना ओमरॉन उत्पादनांच्या व्यापक रेंजचे लाइव्ह डेमो देतो. हे सेंटर सुरूवातीला १०० हून अधिक ग्राहकांना सुविधा देण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येईल आणि त्यांना ओमरॉन हेल्थकेअर उत्पादनांच्या वापरासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात येईल.
या घोषणेबाबत बोलताना ओमरॉन हेल्थकेअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काझुनोरी टोकुरा म्हणाले, ”ओमरॉन सातत्याने नाविन्यता आणण्यासह ग्राहकांसोबत प्रबळ नाते तयार करण्यासाठी अद्वितीय पद्धती आणत आहेत. तसेच ते ग्राहकांना आरोग्यदायी जीवनशैली व दर्जात्मक राहणीमानाचा अनुभव देत आहेत. मुंबईमधील आमच्या नवीन एक्स्परिअन्स सेंटरच्या सादरीकरणासह आम्ही अधिकाधिक लोकांना सध्याच्या व भावी आरोग्यासाठी अत्याधुनिक उत्पादने आणि दर्जात्मक सेवा देण्याचा प्रयत्न करतो.”
या सुविधेमधून कंपनीचे ‘झीरो इव्हेण्ट्स’ २०२० व्हिजन (हृदयाघात व ब्रेन स्टोक्सच्या कोणत्याच घटना नाहीत) दिसून येते. ही सुविधा डिजिटल रक्तदाब तपासणी करणारे मॉनिटर्स, नेबुलायझर्स, नर्व्ह स्टिम्युलेटर्स, बॉडी फॅट मॉनिटर्स आणि थर्मामीटर्स अशा डिवाईसेसचा वापर करत घरगुती आरोग्य तपासणीची उपलब्धता व प्रॅक्टिस प्रबळ करते.
No comments:
Post a Comment